Mumbai Accident : अनधिकृतपणे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं, मजुराने JCB बाईकवर चढवलं, खाली पडलेल्या तरुणाला चिरडलं; मुंबईत भीषण अपघात

Mumbai JCB & Bike Accident : अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात सारस्वत बँकेसमोर मागील दोन वर्षापासून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठीचे कंत्राट मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला मिळाले.
Mumbai JCB & Bike Accident
Mumbai JCB & Bike Accident Saam Tv News
Published On

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरातील कोर्ट यार्ड जंक्शन येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबीने जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर अपघात झाला. या अपघातात ४३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. विजय शिवराम पुजारी असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी जेसीबी चालक सुरज कुमार रमेशकुमार रावत (वय २३) विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी जेसीबी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात सारस्वत बँकेसमोर मागील दोन वर्षापासून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठीचे कंत्राट मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला मिळाले. मात्र या कंपनीकडून हे काम करण्यासाठी अनधिकृतपणे शेरसिंग राठोड याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. मात्र या कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली करून या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंत्राटदाराच्या जेसीबीने दुचाकीवरून जाणाऱ्या विजय पुजारीला जोरदार धडक दिली. लोकांनी आरडा ओरडा केला मात्र जेसीबी चालकाने जेसीबी खाली पडलेल्या विजय यांच्या अंगावर चढवला, यामुळे झालेल्या अपघातात विजय पुजारी हा तरुण गंभीर जखमी झाला. या ठिकाणी असणारे कंत्राटदराचे कर्मचारी काम टाकून पळून गेले. नागरिकांनी विजय पुजारी याला उचलून उपचारासाठी महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विजय यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून घोषित करण्यात आले.

Mumbai JCB & Bike Accident
Maharashtra Weather Update : राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार; 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट, IMDचा हादरवणारा रिपोर्ट

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्याचे मार्शल २ सदर ठिकाणी पोहोचले. नागरिकांनी अपघाताची संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पानसरे, आंबोली मार्शल २ स्वतः कुपर रुग्णालयात पोहोचले. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना अपघातात जखमी झालेला तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालय प्रशासनाने दिलेली माहिती यावरून आंबोली पोलिसांनी जेसीबी चालक सुरज कुमार रमेशकुमार रावत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अपघातास कारणीभूत ठरलेला जेसीबी पोलिसांनी हस्तगत केला असून आंबोली पोलीस आरोपी चालक सुरज कुमार रावत याचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी यांनी घटनास्थळावर धाव घेतली. हा रस्ता मागील दोन वर्षापासून बनवण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. कंत्राटदाराला महापालिकेने हे काम दिलेले नाही. मात्र हे काम मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडून शेरसिंग राठोड या कंत्राटदाराला दिलेले आहे. शेरसिंग राठोड यांच्याकडून हे काम करत असताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप कुशल धुरी यांनी केला आहे. या ठिकाणी काम सुरू असताना बेरिगेटिंग लावणे आणि दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित असताना कांत्राटदाराकडून मात्र कोणतीही नियम या ठिकाणी पाळले जात नाहीत. शिवाय पालिकेचे रस्ता विभागाचे डेप्युटी चीप इंजिनियर आणि वॉर्डमधील पालिकेचे रस्ता विभागाचे अधिकारी हे शेरसिंग राठोड यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कुशल धुरी यांनी केला आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीसाठी आम्ही लढा लढून त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असेही धुरी यांनी म्हटले आहे.

Mumbai JCB & Bike Accident
Jalgaon News : अंगावरची हळद ओली, सीमेवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल; नववधू म्हणाली 'Operation Sindoor'साठी माझं सौभाग्य पाठवतेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com