Pune Politics : पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? तीनवेळा आमदार, 'हा' बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

Sangram Thopte Joins BJP : थोपटेंनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात आहे.
Bhor Former Congress MLA Sangram Thopte to join BJP
Bhor Former Congress MLA Sangram Thopte to join BJP Saam Tv News
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : काँग्रेसचे बडे नेते संग्राम थोपटे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे. प्राप्त माहितीनुसार, भाजप प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत बैठक झाल्याचंही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे नेते संग्राम थोपटेंनी एकूण तीनवेळा भोर विधानसभा मतदारसंघाचं आमदारपद भूषवलेलं आहे. या मतदारसंघात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. थोपटे यांनी भोरमध्ये त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत कदाचीत त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. येत्या रविवारी ते काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.

Bhor Former Congress MLA Sangram Thopte to join BJP
Waqf Amendment Act: वक्फ बोर्डाला पूर्ण स्थगिती नाही पण...; सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं?

थोपटेंनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असंही सांगण्यात आलेलं आहे.

दुसरीकडे संग्राम थोपटे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातही हाचलाची सुरू झाल्या आहेत. पुणे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पुण्यातील काँग्रेस भवनात एक तातडीची बैठक बोलावली आहे. संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसू शकतो. कारण संग्राम थोपटे यांचे वडील जवळपास सहावेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिलेले आहेत. संग्राम थोपटे हेदेखील तीन वेळा भोरमधून आमदार राहिलेले आहेत. यंदा त्यांचा पराभव झाला मात्र त्यांचे राजकीय वजन अजूनही कायम आहे. त्यामुळेच थोपटेंच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांनंतर पुण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे.

Bhor Former Congress MLA Sangram Thopte to join BJP
Parbhani Crime : माझी फसवणूक केली, कुटुंबाकडे लक्ष ठेवा; चिठ्ठी लिहून प्रा. शिक्षकाने आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com