
परभणी : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एका प्राथमिक शिक्षकाने आत्महत्या केली आहे. गळफास घेत या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्यात आपण कुणामुळे आत्महत्या करत आहोत? आणि माझ्या आत्महत्येचं कारण काय? याचा देखील उल्लेख केला आहे. सोपान उत्तमराव पालवे असं या शिक्षकाचं नाव आहे.
चिठ्ठीत काय लिहिलेलं?
मी हे स्वत: लिहित असून मी मागील चार वर्षापासून नृसिंह प्राथमिक शाळा मंगरुळ (बु) ता. मानवत जि. परभणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सदरील पदावर घेण्यासाठी माझ्याकडून माझ्या संस्थेचे तसेच नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान परभणीचे सचिव बळवंत मधुकर खळिकर यांनी त्यांच्या परभणी येथील 'मधुकुंज' या राहत्या घरी चार वर्षापूर्वी माझ्याकडून २० लाख रुपय नगद घेतले, आणि मला मंगरुळ (बु) येथील नृसिंह प्रा. शाळेत तेव्बा ४० टक्के अनुदानित पदावर घेतो (सध्या ६० टक्के) असं म्हणाले. हे पैसे देण्यासाठी मी स्वत:चं शेत विकलं आणि काही पैसे नातेवाईकांकडून उसने घेत त्यांना स्व:हस्ते पैसे दिले.
परंतु संस्थेन बनावट संचमान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करुन २०१८-१९च्या संचमान्यतेनुसार प्रत्यक्षात २०१६ पासून संस्थेची संचमान्यता ऑनलाईन अपडेट नाही. २० टक्के शालार्थ प्राप्त करुन पगार चालू केला. मार्च २०२४चे बिल नृसिंह प्रा.शाळा मंगरुळ आणि नृसिंह प्रा. शाळा लोहगाव या दोन शाळेचे लोहगाव (एकूण १३ शिक्षक) आणि मंगरुळ (एकून ७ शिक्षक) मार्चचे बिल २० टक्क्यावरुन डायरेक्ट ६० टक्क्यांनी पगार काढले. यासाठी संस्थेने माझ्याकडून पाच लाख अतिरिक्त घेतले.
मार्च २०२४च्या बिलानंतर एप्रिल, मे आणि जूनचे बिल संस्थेने अजून काढले नाही. तसेच जुलैचे बिल ६० टक्क्यांवरुन २० टक्के ने काढले. अशाप्रकारे माझी केलेली फसवणूक आणि मला आत्महत्या करण्यासा भाग पाडल्यामुळे याची चौकशी करावी, असं सोपान पालवे यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.