Malegaon Karkhana Election : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारच सरस, दादांच्या पॅनलला घवघवीत यश मिळण्याचे संकेत?

Baramati Malegaon Karkhana Election : आतापर्यंत २१ जागांपैकी एका जागेवर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचा उमेदवार विजयी झाला असला तरी दोन ठिकाणी निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांची आघाडी दिसून येत आहे.
Baramati Malegaon Karkhana Election
Baramati Malegaon Karkhana ElectionSaam Tv News
Published On

पुणे (बारामती) : अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यातील निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ‘ब’ वर्ग सभासद प्रतिनिधी या प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. ही निवडणूक स्थानिक साखर कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती पवार कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाचं प्रतीक ठरली आहे. या निवडणुकीमध्ये सुरवातीपासून अजित पवारांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी त्यांनी अद्यापही कायम ठेवलेली आहे.

आतापर्यंत २१ जागांपैकी एका जागेवर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचा उमेदवार विजयी झाला असला तरी दोन ठिकाणी निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांची आघाडी दिसून येत आहे. अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता स्वतःकडे राखण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुरूवातीपासून आघाडी घेतलेल्या अजित पवारांच्या पॅनलने अद्यापही ती आघाडी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे कारखान्याची सत्ता अजित पवारांच्या हातात जाणार असल्याची चर्चा आता बारामतीत रंगली आहे.

Baramati Malegaon Karkhana Election
Palkhi Video : माऊलींच्या पालखी सोहळ्यात बैल उधळला, सासवडमधील व्हिडिओ व्हायरल

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत विजय मिळवत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनलच्या संपूर्ण यशाचे संकेत मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे इतर पॅनल्सही जोरदार संघर्ष करत असल्यामुळे ही निवडणूक आता अधिक चुरशीची आणि रोमाचंक वळणावर पोहोचली आहे. या निवडणुकीत अजित पवार यांना थेट ८५ वर्षीय भाजपचे नेते आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचे आव्हान आहे. त्याशिवाय एकूण चार पॅनल्स रिंगणात असल्यानं ही लढत फारच अटीतटीची ठरत आहे. अजित पवार यांचा विजय ही निळकंठेश्वर पॅनलसाठी सकारात्मक सुरुवात असली, तरी अंतिम निकाल काय लागतो आणि कोण सत्तेवर येते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. पुढील काही तासांत या निवडणुकीचा अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.

Baramati Malegaon Karkhana Election
BJP MLA Crime: भाजप आमदाराकडून बँक मॅनेजरला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com