Jarandeshwar sugar factory : राज्यातील सर्वात मोठी बातमी! जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु

jarandeshwar sugar factory inquiry : जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरु करण्यात आली आहे. एसीबीने या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वात मोठी बातमी! जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु
Jarandeshwar sugar factory :Saam tv

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरु करण्यात आली आहे. लाचलुचपत विभाग या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत विभागााकडून ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशी संदर्भातील पत्र साम टीव्हीच्या हाती आलं आहे.

लोकसभा निवणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर चौकशी सुरु जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यहार,कोरगाव येथील एक भुखंड आणि डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात ही चौकशी सुरु करण्यात येत आहे. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या कारखान्याची चौकशी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यातील सर्वात मोठी बातमी! जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु
Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठा ट्विस्ट; ससून रुग्णालयातील कर्मचारी पळाला, पोलिसांचा शोध सुरू

नेमकं काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, ईडीने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं होतं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी २२ ऑगस्ट २०२९ रोजी गुन्हा दाखल केला. याच आधारावर ईडीने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. जरंडेश्वर कारखाना २०१० साली विक्री करण्यात आली होती. हा कारखाना मूळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. याबाबत योग्य कार्यपद्धती पाळण्यात आली नाही, असा आरोप आहे.

राज्यातील सर्वात मोठी बातमी! जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु
Nashik Breaking: मोठी बातमी! बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये छापायचे पाचशेच्या नोटा

जरंडेश्वर कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. त्यानंतर हा कारखाना जरंडेश्वर कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला. तसेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काही भाग स्पार्कलिंग सोईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com