Accident News : किराणा आणायला गेली पुन्हा घरी परतलीच नाही..., ट्र्कच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Pimpari Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी डी मार्टजवळ भीषण अपघात झाला आहे. किराणा आणताना भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
Accident News : किराणा आणायला गेली पुन्हा घरी परतलीच नाही..., ट्र्कच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पिंपरी चिंचवड काळेवाडीत ट्रकची भीषण धडक.

  • किराणा आणयला गेलेल्या महिलेला वाटेत ट्रकने चिरडले

  • महिलेचा जागीच मृत्यू.

  • पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. किराणा सामान घेऊन जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या आर एम सी ट्रक चालकाने एका महिलेला चिरडले आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ट्र्क चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी डी मार्ट येथून संध्याकाळच्या सुमारास एक महिला किराणा सामान घेऊन घराच्या दिशेने निघाली होती. या दरम्यान मागून येणाऱ्या आर एम सी ट्रकने या महिलेला धडक दिली. या धडकेत महिला ट्रकच्या चाकाखाली आली. आणि तिचा जागीच मृत्यू झाला

Accident News : किराणा आणायला गेली पुन्हा घरी परतलीच नाही..., ट्र्कच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Pune Dam Overflow : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील धरणं १०० टक्के ओव्हरफ्लो

घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. घडलेल्या घटनेप्रकरणी तपास सुरु असून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आरएमसी ट्रक चालकाला काळेवाडी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतला आहे.

Accident News : किराणा आणायला गेली पुन्हा घरी परतलीच नाही..., ट्र्कच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Pune Accident : नियंत्रण सुटलं, डंपर थेट घरात शिरला; ऐनवेळी चालकाने स्टेरिंग फिरवली अन्...

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक पोलिसांनी डंपर, ट्रक चालक आणि आर एम सी ट्रक चालक यांना वाहतूक करण्यासाठी एक वेळ मर्यादा आखून दिली आहे. मात्र डंपर ट्रक चालक तसेच आरएमसी ट्रक चालक नियमबाह्य वेळेत वाहतूक करत असल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com