Pune Accident News : नगर-कल्याण महामार्गावर बस-कारची समोरासमोर धडक; कारचा झाला चुराडा, दोन महिलांचा जागीच मृत्यू

Pune News : नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam Digital
Published On

नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसची समोरुन येणा-या कारला समोरासमोर धडक झाली या भिषण अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला रिया गायकर,कुसुम शिंगोटे असे अपघात मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत.

Pune Accident News
Maharashtra Politics : 'म्हणून आज भुजबळांची वाणी संतांसारखी...बाण कमी, अध्यात्म जास्त'; देवेंद्र फडणवीसांकडून पंढरपुरात तुफान फटकेबाजी

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे नजिक कल्याणच्या दिशेने येणारी कार आणि नगरच्या दिशेने जाणारी खासगी बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात नगर जिल्ह्यातील कळंब येथील रिया गायकर व कुसुम शिंगोटे या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

यात काहीजण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस आणि कार रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने कार आणि बसला बाहेर काढण्यात आलं आहे. यात दोन्ही वाहनांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

Pune Accident News
MSRTC Bus : नंदुरबार जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द; अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीचा परिणाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com