Pune Accident: चाकण-शिक्रापूर रोडवर भीषण अपघात; कंटेनरनं धडाधड २५ वाहनांना उडवलं, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Chakan Shikrapur Road Container Accident: चाकण-शिक्रापूर रोडवर भीषण अपघात झालाय. एका कंटेनरने २५ वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन महिला आणि ५ वर्षाची मुलगी जखमी झालीय.
 Pune Accident
Chakan Shikrapur Road Container AccidentSaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

पुण्यातील चाकणमध्ये भीषण अपघाताची घटना घडलीय. एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना धडक दिली. अपघाताची घटना चाकण-शिक्रापूर रोडवर घडलीय. कंटेनरने दोन महिला ५ वर्षाच्या मुलीला उडवलं. चाकण येथे वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन जाऊन पळून जात होता. त्यावेळी कंटेनरने अजून काही वाहनांना उडवलं. शेल पिंपळगावमध्ये सेलेरो आणि अजून एका गाडीला उडवलं. त्यानंतर बहुळ गावामध्ये पोलिसांच्या एर्टिंगा कारला सुद्धा कंटनेरने धडक दिली.

चौफुलामध्ये कंटनेरने टाटा एस गाडीला धडक दिली. यात धडकेमुळे एक महिला कारमधून खाली पडून कार खाली आली. चाकण ते चौफुला मधील अंतर १५ ते २० किमी अंतर आहे. आज चाकण शिक्रापूर या रस्त्यावर एका कंटेनरने भरधाव वेगात रस्त्यावरून जात असलेल्या २० ते २५. वाहनांना धडक दिली. जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत हा कंटेनर समोर येईल त्या गाड्यांना धडक देत होता.

दरम्यान, पोलिसांनी सुद्धा त्याचा पाठलाग केला मात्र त्याने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिली. अखेर संतप्त नागरिकांनी त्या कंटेनरचा दुचाकीवरून पाठलाग केला. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. तसेच वाहनांना धडक देऊन पसार होणाऱ्या कंटेनरला काही दुचाकीस्वारांनी पाठलाग करत पकडलंय. चाकणमधील वाजेवडी येथे जवळपास २० ते ३० दुचाकीस्वारांनी कंटेनरवर दगडफेक करत कंटनेरला थांबवलं. कंटेनर थांबवल्यानंतर संतप्त नागरिकांना कंटेनर चालकाला चोप दिला. हा कंटेनर (HR 55 AV 2283) शिक्रापूर दिशेने जात होता. चालकाचं नाव अकिब खान असून त्याला पोलिसांनी अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com