Political Crisis: बंडखोर आमदारांवर कारवाई व्हावी; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

PIL Filed In Bombay High Court Against Rebel MLA's Of Shivsena : या याचिकेतून बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी करण्यात आली आहे, तसेच त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.
PIL Filed In Bombay High Court Against Rebel MLA's Of Shivsena
PIL Filed In Bombay High Court Against Rebel MLA's Of ShivsenaSaam TV

मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीचा आजचा सातवा दिवस आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आणि इतर पक्षांचे ९ आमदार आहेत. हे सगळेच ४७ आमदार गुवाहाटीच्या रेडीसन ब्लूमध्येच थाबंले आहेत, त्यामुळे या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात विकासकामं सुस्तावली असून जनतेला वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे. याचविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका (Public Interest Litigation - PIL) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी करण्यात आली आहे, तसेच त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे. (PIL Filed In Bombay High Court Against Rebel MLA's Of Shivsena)

हे देखील पाहा -

या याचिकेत एकनाथ शिंदे, शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्र्यांना गुवाहाटीहून तात्काळ राज्यात परतण्याचे आणि कर्तव्य बजावण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यात बजावण्यात दुर्लक्ष केल्याप्रकरणी बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणीही याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. सोमवारी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेचा उल्लेख करण्यात आला. याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या रिहर्सलनंतर सुनावणीची तारीख देऊ, असे खंडपीठाने सांगितले. मंत्री त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जनहित याचिकेत म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, मंत्र्यांची 'जाणूनबुजून अनुपस्थिती' हे नागरिकांच्या हक्कांवर परिणाम करणारे वर्तन आहे, विशेषत: पावसाळ्यात शेतकरी आणि नागरी समस्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये लोकप्रतिनीधीच मतदारसंघात नसले तर नागरिकांच्या कामांत अडचणी येऊ शकतात असं याचिकेत म्हटलंयं.

PIL Filed In Bombay High Court Against Rebel MLA's Of Shivsena
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना दणका, सर्व खाती काढून घेतली

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा आजचा सातवा दिवस आहे. २० जूनला महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांनंतर कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि नंतर त्यांनी बंडखोरी केल्याचं समजलं. ते २० जूनला सुरतला गेले त्यानंतर २२ जूनपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे इतर ४७ आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी शिंदे गटाची सुरुवातीची मागणी होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव यांनी बंडखोर आमदारांना स्पष्ट संदेश दिला की, मविआतून बाहेर पडून भाजपसोबत जाणार नाही. ज्या आमदारांना जायचे असेल तर ते जाऊ शकतात. शिंदे गटाचा आरोप आहे की मविआ शिवसेनेला उद्ध्वस्त करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मजबूत होत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com