मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना दणका, सर्व खाती काढून घेतली

राज्यात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

मुंबई : शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची खाती काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. जनतेच्या हिताची कामे राहू नयेत म्हणून बंडखोरी केलेल्या मंत्र्यांची खाती काढून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. या मंत्र्यांची असणारी खाती इतर मंत्र्यांकडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Eknath Shinde Latest News)

Uddhav Thackeray
Sanjay Raut : आताची सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांना पुन्हा ED चे समन्स

या मंत्र्यांची खाती घेतली काढून

मंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाते सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे, तर गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे. दादाजी भुसे यांच्याजवळ असलेले कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान भुमरे यांच्याजवळ असलेले रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे. तर मंत्री उदय सामंत यांच्याजवळ असलेले उच्च व तंत्र शिक्षण हे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray
Mental Stress : मानसिक तणावापासून आपल्या नात्याला दूर कसे ठेवाल ?

राज्यमंत्र्यांचेही खाते काढून घेतले

मंत्री शंभूराज देसाई

शिवसेनेचे (ShivSena) मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील खाती संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आले आहे. राज्यमंत्री विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, यांच्याकडे देण्यात आले आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर

राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडे असणारे खाते विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) ही खाती देण्यात आली आहेत.

अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडे असणारी खाती प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) यांच्याकडे देण्यात आली आहेत.

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे देण्यात आली आहेत. (Eknath Shinde Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com