
What is banned in Pune rural from July 11 to July 24 : पुणे ग्रामीण जिल्ह्यात स्फोटक पदार्थ किंवा शस्त्रे-हत्यारेच काय तर, दगड सुद्धा बरोबर नेणं आता गुन्हा ठरणार आहे. कारण स्थानिक प्रशासनानं जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पुढील १५ दिवस हे आदेश लागू असणार आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत. ११ जुलैच्या मध्यरात्री १२.०५ पासून २४ जुलैच्या रात्री १२ पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतील. या आदेशाचं पालन न केल्यास शिक्षा होणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि (३) नुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यात हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात (Pune Rural) अनेक गोष्टींना मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार दाहक किंवा स्फोटक पदार्थ- द्रव्ये, दगड, शस्त्रे, मारा करणारी अस्त्रे, हत्यारे सोबत नेण्यास मनाई करण्यात आलीय. त्याचबरोबर शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, बंदुका, काठ्या आणि इजा पोहोचवणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली आहे. एखाद्या व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन आणि ते जाळणे वैगेरे, मोठमोठ्यानं अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करणं, वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आलीय.
सभ्यता आणि नितिमत्ता धोक्यात येईल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल, राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करणारी चिथावणीखोर भाषणं, आविर्भाव करणं, कोणत्याची चुकीच्या गोष्टी जनतेत पसरवणे, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल असे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन, कलम ३७ चे पोट कलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोक एकत्रित येणं, याशिवाय पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आलाय.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ड्युटी म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना हत्यारं बाळगणं आवश्यक आहे किंवा त्यांना तशी परवानगी आहे, त्या कर्मचाऱ्यांना हे आदेश लागू होणार नाहीत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचं पालन केलं नाही तर कायदेशीर कारवाई होणार आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.