Pravin Darekar: हा मोर्चा मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही - प्रविण दरेकर

मलिकांच्या राजीनामान्याची मागणी करत भाजपकडून अंदोलन पुकारण्यात आलं आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSaam Tv
Published On

मुंबई: "हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, सरकार मलिक यांना पाठीशी घालतयं", असा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. तसेच, मलिकांचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय (Pravin Darekar Says We Will Not Call Off The Protest Before Nawab Maliks Resignation).

Pravin Darekar
फडणवीस सभागृहात अनुपस्थित, गृहमंत्री 'पेनड्राईव्ह बॉम्ब’वर उद्या उत्तर देणार

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. मलिकांच्या राजीनामान्याची मागणी करत भाजपकडून अंदोलन पुकारण्यात आलं आहे. आज भाजपकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमले आहेत.

हे सरकार गेंड्याच्या कातडीचे - प्रविण दरेकर

"हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. नवाब मलिकांना (Nawab Malik) अटक झाल्यानंतरही ते मंत्रीपदावर आहेत. पहिल्या दिवसापासून सरकार मलिक यांना पाठीशी घालत आहे. मलिकांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही. मलिक काय तुरुंगातून उत्तर देणार आहेत का?, असा प्रश्न यावेळी प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) उपस्थित केला. 50 ते 60 हजार नागरिक आज आझाद मैदानात (Azad Maidan) जमलेले आहे. हा मोर्चा मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही", असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com