शिवसेना महिला नेत्याच्या नवऱ्यावर प्राणघातक हल्ला, एकनाथ शिंदेंनी घेतली रूग्णालयात भेट, नेमकं काय घडलं?

Ex-Mumbai Corporator Nazia Sofis Husband Attacked: जोगेश्वरीत शिंदे गटाच्या महिला नेत्याच्या पतीवर हल्ला. उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
Ex-Mumbai Corporator Nazia Sofis Husband Attacked
Ex-Mumbai Corporator Nazia Sofis Husband AttackedSaam
Published On
Summary
  • बीएमली वादातून राडा.

  • शिंदे गटाच्या नाझिया सोफी यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला.

  • उपमुख्यमंत्र्यांकडून विचारपूस.

जोगेश्वरी प्रभाग क्रमांक ७८ मधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नाझिया सोफी यांच्या पतीवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा सर्व प्रकार बीएमसीच्या कामाशी संबंधित वादातून घडला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नाझिया सोफी यांच्या पतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूग्णालयात पोहोचले. त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका नाझिया सोफी यांचे पती अब्दुल जब्बार सोफी यांच्यावर प्राणघातक करण्यात आला. १३ ऑक्टोबर सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. काही अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल जब्बार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार वॉर्ड क्रमांक ७८ मध्ये बीएमसीच्या कामाशी संबंधित वादातून घडला आहे.

Ex-Mumbai Corporator Nazia Sofis Husband Attacked
दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला, चांदीही महागली; तुमच्या भागात आजचा दर किती?

प्राणघातक हल्ला घडल्यानंतर जखमी अब्दुल जब्बार यांना तातडीने पालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्याची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी ट्रॉमा केअर रुग्णालयात जाऊन अब्दुल जब्बार यांची भेट घेतली.

Ex-Mumbai Corporator Nazia Sofis Husband Attacked
अकोल्यात भाजपची मोठी खेळी, 'या' पक्षाला झटका; सलग २ वेळा विजयी झालेल्या नेत्याची भाजपात एन्ट्री

तसेच तब्येतीची विचारपूस केली. हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असेही आश्वासन जब्बार यांना दिले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना अब्दुल जब्बार यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com