''समीर वानखेडे मुस्लीमच ते रोज नमाज पढायचे; वडीलांचे नाव दाऊद वानखेडे''

गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात पुन्हा सुनवाणी होणार आहे.
''समीर वानखेडे मुस्लीमच ते रोज नमाज पढायचे; वडीलांचे नाव दाऊद वानखेडे''
''समीर वानखेडे मुस्लीमच ते रोज नमाज पढायचे; वडीलांचे नाव दाऊद वानखेडे''Saam Tv
Published On

मुंबई: समीर वानखेडेंच्या नावावरुन सुरु असलेल्या वादामध्ये आता वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहिद कुरेशी यांनी साम टीव्हीशी बोलताना काही माहिती उघड केली आहे. डॉ.जाहिद कुरेशी म्हणाले, ''समीर वानखेडे मुस्लीम होते म्हणूनच आम्ही लग्न ठरवलं. लग्नासाठी त्यांच्याकडून विचारणा झाली होती. समीर वानखेडे नमाज पढायचे. रोजा पढायचे. त्यांच्या घरी मुस्लीम धर्माचे पालन होत होते. त्यांच्या वडिलांचे नाव 'दाऊद वानखेडे' होतं. त्यांची आई चांगली होती. त्यांच्या निधनानंतर काय झाले माहिती नाही. मुस्लीम असल्याशिवाय 'निकाह' झाला नाही. आमच्यासोबत धोका झाला असं आम्हाला वाटत नाही कारण आमचा आता काही संबंध नाही''.

गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात पुन्हा सुनवाणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये आर्यन खान प्रकरण कसे समीर वानखेडे यांच्या भोवती घुमू लागले हे कळाले देखील नाही. दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर मोठे आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एनसीबीचं एक पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. आणि ते समीर वानखेडे आणि एकंदरीतच संपुर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दरम्यान ३ ऑक्टोबरपासून आर्यन खान आर्थर रोडच्या कारागृहात आहे. त्या दरम्यान आर्यन खान प्रकरणाला नवनवीन वळण मिळत गेलं. आर्यन खान प्रकरण कसं समीर वानखेंडेंकडे झुकलं हे कळालं देखील नाही. आर्यन खान सह त्याच्या साथीदारांची देखील चौकशी सुरु आहे. एनसीबीने अनन्या पांडेला देखील चौकशीसाठी बोलावले होते. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील चॅट देखील व्हायरल झाले होते. आर्यन खान प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. पंच म्हणून नेमण्यात आलेल्या प्रभाकर साईलने खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचबरोबर या कारवाईतील मुख्य पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आज सकाळी गोसावीची वैद्यकीय तपासणी करुण कोर्टात हजर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com