शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरवर झालेल्या कारवाईनंतर अशी चर्चा सुरु आहे.
उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशीच्या विरोधकांमध्ये सुरु असलेल्या चर्चांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याआधी भाजप खासदार नारायण राणे, यशवंत जाधव, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी असे अनेक नेते आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. (Latest Marathi News)
मातोश्रीमध्ये काय आहे. मातोश्रीला हेरणारे रडार अजून जन्माला आले नाही. तिकडे काहीही घोळ नसतात, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे कोणत्या भानगडीत पडत नाही. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कसं आहे, हे अख्खा देशाने पाहिलं आहे. त्यामुळे असे रडार मातोश्रीचं काय करु शकत नाहीत, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. (Political News)
सीबीआयने कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मुंबईतील यूआयएल कंपनीचे किशोर आवरसेकर यांच्यासह इतर संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.