Breaking News : बनावट नाेटा छपाईच्या कारखान्यावर पाेलिसांची रेड; सव्वा सात लाखांसह एक ताब्यात

या बनावट नाेटा तयार करण्याच्या कारखान्याचा आणि टाेळीचा पोलिस कसून तपास करीत आहेत.
Breaking News , Mankhurd
Breaking News , MankhurdSaam tv

Mankhurd Breaking News : मानखुर्द येथे बनावट नोटा बनविल्या जाणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल सात लाख १६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी (police) ताब्यात घेतल्या आहेत.

पाेलिसांनी हा छापा टाकल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पाेलिसांनी या छाप्यात नोटा बनवणारी मशीन ताब्यात घेतली आहे. या छाप्यात एकूण ९ लाखांच्या ऐवजासह पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक केली आहे. या बनावट नाेटा तयार करण्याच्या कारखान्याचा आणि टाेळीचा पोलिस कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com