Video : वृद्ध इमारतीच्या 22 व्या मजल्याच्या संरक्षक कठड्यावर बसला; कुटुंबांचा जीव पडला भांड्यात, नेमकं काय घडलं?

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे.
mumbai news
mumbai news Saam tv
Published On

संजय गडदे

मुंबई : मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवलीतील इमारतीच्या संरक्षक कठड्यावरून एक मनोरुग्ण व्यक्ती जीव देण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. कांदिवलीच्या समता नगर पोली ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

कांदिवली (Kandivali) पूर्वेकडील समता नगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील ठाकूर व्हिलेज परिसरातील एका उंच इमारतीच्या संरक्षक कठड्यावरून एक मनोरुग्ण व्यक्ती जीव देण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. हा मनोरुग्ण व्यक्ती इमारतीच्या भिंतीवर चढल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेने त्या व्यक्तीचं कुटुंब आणि परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र, मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या मनोरुग्ण व्यक्तीला सुखरूपपणे वाचवल्यामुळे त्यांच्या कुटुंब आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेकडील सरोवर इमारतीत राहणारे आनंद प्रभू (७१ वर्ष)हे मागील काही दिवसापासून आजारी आहेत. त्यांचे मानसिक संतुलन देखील बिघडले असल्याचे समजते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते.

mumbai news
UP Encounter: उमेश पाल हत्याकांड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पहिली गोळी झाडणारा उस्मान पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

मात्र, काल अचानक आनंद प्रभू इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील सरक्षक भिंतीवरून बाहेरील बाजूस उतरून जीव देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सतर्क नागरिकांनी त्वरित मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कंट्रोल क्रमांकावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळावर पोहोचले.

अग्निशमन दलाचे जवान आर के राठोड यांनी आपले कौशल्य पणास लावून त्या मनोरुग्ण नागरिकाचा जीव वाचवला. आनंद प्रभू यांचा जीव वाचवल्यानंतर त्यांचे कुटुंब आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com