Pune News : PMPML बस चालकाचा प्रताप, चक्क सिनेमा बघत चालवली गाडी; धक्कादायक VIDEO व्हायरल

Pune PMPML News : पुण्यात पीएमपीएमएल बस चालकाने चक्क सिनेमा पाहत बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
PMPML Bus Driver News
PMPML Bus Driver News Saam TV

PMPML Bus Driver Video: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात पीएमपीएमएल बस चालकाने चक्क सिनेमा पाहत बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चालकाच्या या बेजबाबदारपणाने प्रवाशांच्या जीव मात्र टांगणीला लागला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Latest Marathi News)

या चालकावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात पीएमपीएमएल बस चालक आणि वाहक यांच्या बेजबाबदारपणाच्या घटना उघडकीस येत आहे.

काही दिवसांपूर्वी बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला होता. प्रवास करत असताना बसमधील कंडक्टर विश्वनाथ याने पीडितेसोबत अंगलगट केले होते. आता चालकाने चक्क सिनेमा पाहत गाडी चालवल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

PMPML Bus Driver News
Viral Video: लोकलमध्ये फॅशनचा जलवा! स्कर्ट घालून तरुणाची एन्ट्री, लोक बघतच राहिले; पाहा VIDEO

सिनेमा पाहत बस चालवत असताना, पीएमपीएमएल बस चालकाचा हा व्हिडीओ बसमधील प्रवाशाने शूट केला आहे. हा प्रकार नेमका कोणत्या मार्गावर घडला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चालकाच्या बेजबाबदारपणाचा व्हिडीओ समोर येताच, नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com