PM Modi In Kargil: भारतीय सैन्यावर आम्हाला गर्व आहे; कारगिलमध्ये पंतप्रधानांची सैनिकांसोबत दिवाळी

PM Modi Diwali With Army: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी सतत देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात.
PM Modi Diwali With Army
PM Modi Diwali With ArmyTwitter/@PMOIndia
Published On

PM Modi Latest News: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावेळेप्रमाणेच यावेळीही सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. पंतप्रधान मोदी आज, सोमवारी सकाळी कारगिलला पोहोचले. याठिकाणी त्यांनी सैनिकांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी ते दिवाळीच्या (Diwali) उत्सवात सामील होतील, असे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी दिवाळीनिमित्त सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Modi Latest News)

पीएम मोदींनी (PM Modi) ट्विट करून म्हटले - सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीचा संबंध तेज आणि प्रकाशाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा भाव घेऊन जावो. मला आशा आहे की तुमची दिवाळी कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात जावो.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी सतत देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. 2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ते सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी करतात. यावेळी त्यांची दिवाळी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी होणार आहे.

PM Modi Diwali With Army
Laxmi Puja 2022 : देवीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'या' गोष्टी करा, घरात येईल सुख-समृध्दी

पंतप्रधान मोदींची सीमेवरील दिवाळी

4 नोव्हेंबर 2021: पंतप्रधान मोदींनी राजोरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

14 नोव्हेंबर 2020: पंतप्रधान मोदींनी प्रकाश पर्व, जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्ट येथे सैनिकांसोबत सातवी दिवाळी साजरी केली.

27 ऑक्टोबर 2019: पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये नियंत्रण रेषेजवळ (LOC) सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पीएम मोदींनी राजौरी येथे नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले.

7 नोव्हेंबर 2018: 2018 मध्ये, पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

18 ऑक्टोबर 2017: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीरमधील गुरेझमध्ये सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करून त्यांना प्रोत्साहन दिले.

30 ऑक्टोबर 2016: पंतप्रधान मोदी 2016 मध्ये हिमाचलच्या किन्नौरमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले. येथे त्यांनी भारत-चीन सीमेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Modi Diwali With Army
Marigold : लक्ष्मीपूजनासाठीची तयारी सुरु; झेंडूला मागणी वाढली, दर गडगडला

11 नोव्हेंबर 2015: पंतप्रधान मोदींनी पंजाबमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. येथे ते 1965 च्या युद्ध स्मारकालाही भेट देण्यासाठी आले होते.

23 ऑक्टोबर 2014: मे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 23 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून सियाचीनमध्ये पहिली दिवाळी साजरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com