Kalyan News: कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार; सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड

येत्या वर्षभरात हा रस्ता हिरवागार पाहायला मिळणार आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Tree Plantation: कल्याण ते टिटवाळा हा महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या रिंगरोडच्या दुतर्फा तब्बल बाराशेहून अधिक वृक्ष लावण्यात येणार आहेत. आजच्या जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून दुर्गाडी चौक ते गांधारीपर्यंत साडेचारशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या वर्षभरात हा रस्ता हिरवागार पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

Kalyan News
Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी 36 तासांत 5 हजार किमीचा प्रवास करणार, 7 शहरांमध्ये 8 कार्यक्रमांना हजेरी लावणार

महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील (Dombivli) वाहतूक कोंडी कमी करण्यासह कल्याणहून टिटवाळ्याला अवघ्या काही मिनिटांत जाता येणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यात बनत असलेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर कल्याणमधील (Kalyan) दुर्गाडी चौक, सापार्डे, गांधारी, बारावे आदी गावातील दोन्ही बाजूचा रस्ता बनून तयार आहे.

या प्रकल्पासाठी अनेक शेतजमिनी आणि वृक्ष बाधित झाले असून त्याबदल्यात आंबिवली येथील टेकडीवर केडीएमसीकडून (KDMC) भले मोठे निसर्ग उद्यान बनवण्यात आले आहे. मात्र कल्याण आणि त्यापुढील इतर ज्या भागातून हा रस्ता जातो त्याच्या सभोवताली वनश्रीने नटलेला परिसर आहे.

Kalyan News
Train Accident Video: ट्रेन चालवताना महिला चालक मोबाईलमध्ये व्यस्त; समोरुन दुसरी ट्रेन आली अन्... पाहा भयंकर अपघाताचा थरार

या वृक्ष संपदेचा विचार करता हा रस्ता काहीसा उघडा बोडका आणि अतिशय वैराण दिसत होता. या पार्श्वभूमीवर शेजारील निसर्गाशी अनुरूप होण्यासह त्याला पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख देण्याच्या दृष्टीने रिंगरोडच्या कल्याण ते टिटवाळा मार्गावर दुतर्फा वृक्ष लावण्यात येत असल्याची माहिती महापालिका सचिव संजय जाधव यांनी दिली. (Kalyan News)

रिंगरोडवर लावण्यात येणाऱ्या प्रत्येक वृक्षाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येणार ताम्हाणसह कदंब, जांभूळ, मोहगणी, बकुळ अशी वेगवेगळी प्रजातीची वृक्ष संपदा बहरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com