Train Accident Video: ट्रेन चालवताना महिला चालक मोबाईलमध्ये व्यस्त; समोरुन दुसरी ट्रेन आली अन्... पाहा भयंकर अपघाताचा थरार

Viral Accident Video: महिला चालकाचा निष्काळजीपणा बेतला प्रवाशांच्या जिवावर...
Viral Train VIdeo
Viral Train VIdeoSaamtv
Published On

Train Accident Viral Video: वाहन चालवताना मोबाईलचा (Mobile) वापर करणं किती धोकादायक असतं याची सर्वांनाच कल्पना असते. वाहतूक पोलीस यासंबधी वारंवार आवाहन करत असतात. पण असं असतानाही अनेक लोक सर्रासपणे मोबाइलचा वापर करताना दिसतात. पण हाच नियम ट्रेनबद्दलही लागू होतो. कारण ट्रेन चालवतानाही मोबाईलचा वापर करने अपघाताला निमंत्रण देणारे ठरु शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल... (Latest Marathi News)

Viral Train VIdeo
Nashik Crime News: नाशिक बाजार समिती निवडणुकीत राजकारण तापलं, काँग्रेसच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असलेला व्हिडिओ रशियामधील असून ही दुर्घटना ऑक्टोबर 2019 मध्ये घडल्याचे समोर आले आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक भरधाव ट्रेन जाताना दिसते आहे. ज्या रूळांवरून ही ट्रेन जाते आहे, त्याच रूळांवर समोर दुसरी ट्रेन आहे. त्या ट्रेनला जाऊन ही ट्रेन धडकते. या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे महिला ड्रायव्हरचा निष्काळजीपणा. ही महिला ट्रेन चालवत असताना मोबाईलचा वापर करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Viral Train VIdeo
Maratha Kranti Morcha आक्रमक, पंढरपूरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; 'आरक्षण दिले तरच मुख्यमंत्र्यांना यंदाची आषाढीची महापूजा करू देणार'

ट्रेन चालवताना अगदी आरामात ती मोबाईलमध्ये बघते आहे. महिलेचं पुढे ट्रॅकवर अजिबात लक्ष नसतं. पण त्याचवेळी ट्रॅकवर एक ट्रेन उभी असते. महिलेचं लक्ष खाली फोनमध्ये असल्याने तिला याची कल्पना नसते. पण जेव्हा ती पाहते तेव्हा ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर जाऊन जोरात आदळते. पण सुदैवाने महिला चालकाल काही जखम होत नाही.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरला पोस्ट करण्यात आला असून याच्या माध्यमातून एक छोटासा हलगर्जीपणा किती महागात पडू शकतो हे दाखवण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चालकाच्या चुकीची शिक्षा नाहक प्रवाशांना भोगावी लागली, अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com