

Pimpri Chinchwad News : पिंपरी मार्केट (pimpri market) येथे रेडिमेड दुकानदाराला मारहाण करून त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या खंडणीखोरांना पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या (arrests) ठोकल्या आहेत. या कामगिरीचे व्यापा-यांकडून काैतुक केले जात आहे. (Maharashtra News)
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गेल्या काही महिन्यापासून पिंपरी मार्केट येथे माधव वाघमारे, आतिश शिरसाठ व त्याचे इतर काही साथीदार काही दुकानदारांना धमकावून त्यांच्याकडे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करत होते.
पिंपरी मार्केट येथे दुकान चालवायचं असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी माधव वाघमारे आणि आतिश शिरसाठ हे दुकान मालकांना देत होते.
हा हप्ता दिला नाही तर माधव वाघमारे आणि आतिश शिरसाठ हे दुकान मालकाला मारहाण करून त्यांच्या दुकानातील रेडिमेड कपडे पळवत असत. या प्रकरणात एका दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून खंडणी विरोधी पोलीस पथकाने माधव वाघमारे आणि आतिश शिरसाठ विरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये (भा.द.वी 386, 387, 392, 323, 504 आणि 34) गुन्हा दाखल केला आहे. माधव वाघमारे यास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा सहकारी आतिश शिरसाठ याचा पाेलिस शाेध घेताहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.