Pimpri-Chinchwad : हातात चाकू, तोंडावर मास्क, पिंपरी चिंचवडमधल्या 'मास्क-मॅन'चा चेहरा समोर; VIDEO

Pimpri-Chinchwad City : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे एक मास्क मॅन फिरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. काही तासात पोलिसांनी या मास्क मॅनला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे रहस्य उलगडले.
Pimpri-Chinchwad Mask Man
Pimpri-Chinchwad Mask Mansaam tv
Published On
Summary
  • पिंपरी चिंचवडच्या निगडीत हातात चाकू आणि तोंडावर मास्क घालून फिरणारा मास्क मॅन पोलिसांच्या ताब्यात आला.

  • पोलिसांनी चौकशीदरम्यान उघड केले की, मास्क मॅन मच्छिंद्र नारायण नवघिरे हा मनोरुग्ण आहे आणि भंगार वेचून आपला उदरनिर्वाह करतो.

  • पोलिसांनी त्याला समजपत्र देऊन सोडले, तरीही त्याचे वर्तन स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करणारे होते.

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pimpri-Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात हातात चाकू घेऊन एक मास्क मॅन फिरत होता. या मास्कमॅनची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर चाकू घेत रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क मॅनला पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे वर्तन असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मास्क मॅनचे रहस्य उलगडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या निगडी येथे हातात चाकू घेत एकजण फिरत होता. त्याच्या तोंडावर मास्क लावलेला होता. या मास्क मॅनची माहिती मिळताच अगदी काही तासांच्या आत निगडी पोलिसांनी या मास्क मॅनला ताब्यात घेतले. हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क मॅन हा मनोरुग्ण भंगार वेचक असल्याचे म्हटले जात आहे.

Pimpri-Chinchwad Mask Man
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र नारायण नवघिरे (वय ६८ वर्ष) असे मास्क मॅनचे नाव आहे. मच्छिंद्र नारायण नवघिरे हे कचरा आणि भांगर वेचक आहेत. कचऱ्यातील भंगार वेचून आणि ते विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने तो धारदार चाकू घेऊन रस्त्यावरुन फिरत होता.

Pimpri-Chinchwad Mask Man
Pune : ८२ कोटींची चोरी, कंपनी काढून डेटा विकला; हिंजवाडीतलं कांड कसं समोर आलं?

पोलिसांनी मच्छिंद्र नारायण नवघिरे यांची चौकशी केली. त्यात मच्छिंद्र हे मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना समजले. पण त्यांचे हे वागणे दहशत निर्माण करणारे असल्याने निगडी पोलिसांनी त्यांना समजपत्र दिले आहे. पोलिसांनी समज देऊन कथित मास्क मॅन मच्छिंद्र नारायण नवघिरे यांना सोडून दिल्याचे म्हटले जात आहे.

Pimpri-Chinchwad Mask Man
Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com