आगामी निवडणुकीआधी बड्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल; अटक होणार? पुण्यात खळबळ

Case Filed Against Anup More Ahead of Civic Polls: भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अडचणीत वाढ. तेजस्विनी कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
Case Filed Against Anup More Ahead of Civic Polls
Case Filed Against Anup More Ahead of Civic PollsSaam
Published On
Summary
  • भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल.

  • पिंपरी चिंचवडमधील भाजप पक्षातील वाद चव्हाट्यावर.

गोपाळ मोटघरे, साम टिव्ही

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनुप मोरे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अनुप मोरे यांच्यावरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात भाजप युवा मोर्चातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, तक्रारीवरून त्यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case Filed Against Anup More Ahead of Civic Polls
ट्रक भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यात भीषण अपघाताचा थरार

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्विनी यादव यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं की, त्यांच्यावर सहा ते सात जणांनी मिळून शिवीगाळ आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यासह त्यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केलंय.

या घटनेनंतर तेजस्विनी कदम यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात सुरूवातीला दोन महिलांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहोत. त्यानंतर याच प्रकरणात अनुप मोरे यांच्या नावाचीही नोंद करण्यात आली. अनुप मोरे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Case Filed Against Anup More Ahead of Civic Polls
'माझे प्रायव्हेट व्हिडिओ..' गर्लफ्रेंडकडून UPSCच्या विद्यार्थ्याची हत्या; Ex-बॉयफ्रेंड सिलिंडरवाल्याची मदत घेऊन काटा काढला

महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चातील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com