पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक आरक्षणाची सोडत जाहीर; अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव, कुणाला कुठे संधी?

Pimpri-Chinchwad Municipal Reservation: पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली.
Pimpri-Chinchwad Municipal Reservation
PCMC Election Reservation Declared — Half of the seats reserved for women this time.saam tv
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण १२८ जागांसाठी आरक्षण सोडत

  • ६४ जागा महिलांसाठी राखीव, महापालिकेत प्रथमच ५० % आरक्षण.

  • जातीनिहाय आरक्षण करण्यात आले आहे.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झालीय. नाशिक, मुंबई, ठाणे, पुणेनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेची जातनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण ३२ प्रभागात १२८ नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यावेळी महापालिकेत प्रथमच १२८पैकी ६४ पद ही महिला नगरसेवकांसाठी राखीव असणार आहेत.

त्यापैकी अनुचित अनुसूचित जातीचे २० जागा असून १० जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राजीव असणार आहेत. अनुसूचित जमातीच्या तीन जागा असुन दोन जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांचं मागासवर्ग प्रवर्गातील 34 जागा असून १७ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील साठी एकूण ७१ जागा असून यापैकी ३५ जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Pimpri-Chinchwad Municipal Reservation
BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांसाठी ११४ वॉर्ड आरक्षित, कोणता वॉर्ड कुणासाठी? वाचा संपूर्ण यादी

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढली गेली. आता आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांना निवडणूक लढण्यासाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी आधी राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडतीची नियमावली सांगितली. त्यानंतर निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

Pimpri-Chinchwad Municipal Reservation
PMC Elections : पुण्यात अनेक दिग्गजांना धक्का, PMC निवडणुकीचे आरक्षण जाहीर, वाचा कोणता प्रभाग कुणाला राखीव

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असतील. त्यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असेल. अंदाजे जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी खालील प्रमाणे ३२ प्रभागात आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com