पिंपरी चिंचवड : हजारो दिव्यांच्या प्रकाशाने गणेश तलाव आणि स्वातंत्र्य वीर सावरकर उद्यान परिसर उजळून निघालाय. त्याच बरोबरआकाशात उडणाऱ्या आकाश दिव्यांनी या दीपोत्सवाच्या सणात आणखीच भर घातली.
हे देखील पहा :
प्राधिकरण भागात दरवर्षी साजरा केल्या जाणारा हा दीपोत्सव, आता पिंपरी चिंचवड शहराची ओळख बनला आहे. त्यामुळे या दीपोत्सवाच्या आरासा सोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गणेश तलावाच्या परिसरात हजारो नागरिक इथे गर्दी करतात.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सण-वार विसरत चाललेल्या तरुणांईला, दीपोत्सवाच्या प्रकाशाची जाणीव व्हावी, ह्या उद्देशाने मागील कित्येक वर्षापासून हा दीपोत्सव साजरा करत असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.