Sanjay Raut : पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले; ईडीकडून आरोपपत्र दाखल

गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
Sanjay raut
Sanjay raut saam tv

मुंबई - न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये पत्राचाळ प्रकल्पातून संजय राऊतांनी पैसे कमावले असे ईडीने म्हंटल आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत संजय राऊत यांनी पैसे कमावले असे या आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही ईडीने यात म्हणटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे. (Sanjay Raut Latest News)

Sanjay raut
Maharashtra : 'त्यांच्यात अंतर्गत कलह, उपमुख्यमंत्री फडणवीस नाराज' (पाहा व्हिडिओ)

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीने त्यांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com