Palghar MNS : राज ठाकरेंच्या मेळाव्याला काही तास शिल्लक; मनेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं

MNS Banner Avinash Jadhav Photo Blackened : एकीकडे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
palghar mns dispute party workers blackened avinash jadhav photo
palghar mns dispute party workers blackened avinash jadhav photo Saam Tv News
Published On

पालघर : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची अवघ्या काही तासात तोफ धडाडणार आहे. मात्र, मेळाव्यादिवशीच मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पालघरच्या बोईसर ओसवालमध्ये गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या मनसेच्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं आहे . यामुळे मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघरमधील मनसैनिक यांच्यात असलेला वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून मनसेमधील अंतर्गत वाद समोर येत असून, यापूर्वी अविनाश जाधव आणि पालघरचे मनसेचे माजी जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्यात थेट हाणामारी झाली होती. यानंतर समीर मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मात्र, अवघ्या काही दिवसातच समीर मोरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. त्यानंतर बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला फासलेलं काळ हे या अंतर्गत वादामुळेच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

palghar mns dispute party workers blackened avinash jadhav photo
Maharashtra Politics: ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण घेतलं हाती

अविनाश जाधव यांच्यावर पालघरमधील अनेक मनसैनिक नाराज असून त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यातच समीर मोरे यांचा पालघरमधील मनसे पक्ष बांधणीत मोठा वाटा असल्याने या दोघांमधील वाद अनेक वेळा समोर आला आहे. त्यातच आजच गुढीपाडवा मेळाव्याला जाण्यासाठी मनसैनिकांना आवाहान करणाऱ्या बॅनरला काळं फासण्यात आल्याने हा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा आज पार पडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांच्या अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे आज बोलणार असल्याची शक्यता आहे. सोबतच पक्षांतर्गत कार्यकारणीमध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील.

palghar mns dispute party workers blackened avinash jadhav photo
Pune Crime : अल्पवयीन भाच्याचा अन् मुलाचा वाद, मामाने पट्ट्याने बेदम मारलं; धारधार शस्त्राने छातीत वार करुन संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com