State Excise Department : पुष्पा स्टाईल आली अंगलट; अंडी असल्याचे भासवून दारुची तस्करी, दाेघांवर गुन्हा

या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
palhgar, excise department, eggs, liquor
palhgar, excise department, eggs, liquorsaam tv

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाची (state excise department) दारू (liquor) माफियांवर करडी नजर असल्याचे चित्र सध्या संपुर्ण महाराष्ट्रात हाेत असलेल्या विविध कारवाईतून दिसून येत आहे. पालघर (palghar liquor latest news)) जिल्ह्यात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने माेठी कारवाई करत सुमारे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Breaking Marathi News)

palhgar, excise department, eggs, liquor
Katraj New Tunnel : कात्रज नवीन बाेगदा वाहतुकीसाठी राहणार बंद, मुंबईला जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग (पाहा व्हिडिओ)

दारूची तस्करी कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी माल वाहतुकीच्या गाडीत समोरच्या बाजूस बनावट प्लास्टिकच्या अंड्याचे ट्रे ठेवण्यात आले होते. सुमारे 560 अंड्यांच्या ट्रेमधील 16800 प्लास्टिकची बनावट अंडी हाेती. त्यामागे दमन बनावटीची दारू अशी अनोखी शक्कल लढवून दारूची तस्करी केली जात हाेती.

पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाक्यावर वाहन अडविले. या वाहनाची तपासणी करुन तब्बल 18 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

palhgar, excise department, eggs, liquor
Satara Police Recruitment : सातारा जिल्हा पोलिस भरती संदर्भात जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पो चालकाला पाेलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आणखी एकाचा शाेध सुरु आहे. या कारवाईमुळे दारूसह वाहतूक होणारी ही प्लास्टिकची बनावट अंडी नेमकी कोणत्या भागात विक्रीस जात होती हे अजूनही स्पष्ट झालं नाही.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com