Satara Police Recruitment : सातारा जिल्हा पोलिस भरती संदर्भात जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.
Satara Police Recruitment, Satara,
Satara Police Recruitment, Satara, SaamTv

Satara : महाराष्ट्र राज्यात प्रथमच तृतीयपंथींना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. साताऱ्यात तृतीयपंथीयांची पहिली पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. (Maharashtra News)

Satara Police Recruitment, Satara,
Ulhasnagar : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण : अनिक्षा जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात (पाहा व्हिडीओ)

यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील या तृतीयपंथीयांनी पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज केला होता. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे.

साताऱ्यात तीन जणांच्या भरतीसाठी 70 हुन अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. 100 मीटर, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख (satara sp sameer shaikh) यांनी दिली आहे.

Satara Police Recruitment, Satara,
Karad : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; जाणून घ्या वाहतुक मार्गातील नवा बदल

दरम्यान सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ चे (Satara Police Recruitment 2021) अनुषंगाने शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय जाहिरातमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम फेसबुक, ट्विटर तसेच (www.satarapolice.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणानुसार उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास २० मार्च २०२३ रोजी १८.०० वाजेपर्यंत (सायबर पोलीस ठाणे ०२१६२-२३४१३० Extn - २३८) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा (sp.satara@mahapolice.gov.in) या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com