मुंबईत होणार संतपरंपरेचा जागर; वरळीत ‘पादुका दर्शन महोत्सव’

paduka darshan sohala : मुंबईत संतपरंपरेचा जागर होणार आहे. यासाठी वरळीत ‘पादुका दर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.
paduka darshan sohala
paduka darshan sohala :Saam tv
Published On

मुंबईच्या वरळीत संतपंरपरेचा गौरव आणि आध्यात्मिक विचारांची जागृती करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'कडून ‘पादुका दर्शन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या वरळीतील एनएससीआय डोम शनिवारी आणि रविवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत महोत्सव पार पडणार आहे.

वरळीतील महोत्सवात समाजाला दिशा देणाऱ्या संताच्या कार्याचा जागर केला जाणार आहे. संतांनी दिलेल्या समता, माणुसकी आणि वसुधैव कुटुंबम्'ची शिकवण बदलत्या जीवनशैलीत महत्वाची ठरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना संताच्या पादुकांचे दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर संताच्या विचारांशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.

paduka darshan sohala
आयुष्यात या परिस्थितीत ज्ञान आणि अन्न ठरते घातक, वाचा Chanakya Niti

राज्यभरातील विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. तसेच विविध हरिपाठ मंडळे आणि संस्थांचा सहभाग देखील पाहायला मिळेल. नागेश्वर नवनाथ ध्यानमंदिरचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष अर्जुन केणे, संत सावळाराम बाबा हरिपाठ मंडळ (आयरे गाव) यांच्या रोहिणी पाटील, श्री सिद्धी गणेश मंदिर हरिपाठ मंडळ कोळेगावचे ह.भ.प. प्रेमनाथ पाटील व मंदा पाटील, भगवान जगन्नाथ गोपाल कृष्ण ट्रस्टचे गुरुनाथ म्हात्रे, विठ्ठल मंदिरचे ह.भ.प. बालकृष्ण महाराज तसेच ह.भ.प. अजय महाराज (मांगलूर) यांची हजेरी पाहायला मिळणार आहे.

paduka darshan sohala
Chanakya Niti For Happiness : तुमच्यातही आहेत या सवयी? तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाही

वरळीतील महोत्सव केवळ धार्मिक सोहळा नाही. तर सामाजिक ऐक्य, परंपरेचे जतन आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा उत्सव ठरणार आहे. या सोहळ्याला भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे. तसेच भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com