मुंबई: देशाच्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे (Assmebly Elections 2022) कल हाती येतायात. देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणुका झाल्या असून आता त्यांचे कल हाती येतायत. या कलांनुसार पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे तर कॉंग्रेसची (Congress) पाचही राज्यात सत्ता येण्याची आशा मावळली आहे. भाजपच्या या भव्य विजयाने महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. चार राज्यात मिळालेल्या विजयानंतर भाजप आता महाराष्ट्राकडे वळणार का? भाजप महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस् लॉन्च (Operation Lotus) करणार का? महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार का अशा अनेक प्रश्नांमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अस्वस्थ झाले आहेत. ('Operation Lotus' to be launched in Maharashtra? mva is upset because of five states' Assembly Election Results)
हे देखील वाचा -
भाजप नेते गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं वारंवार सांगत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार अद्यापतरी स्थिर आहे. असं असलं तरी आजच्या निकालानं भाजपचा आत्मविश्वास कमालीच्या उंचीवर आहे. पाचपैकी चार राज्य जिंकून भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. भाजपच्या या प्रचंड आत्मविश्वासाने महाविकास आघाडीचे नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
एकीकडे तीन पक्षांचं सरकार, अंतर्गत राजकारण, मतभेद आणि भिन्न विचारसरणी तर दुसरीकजे भाजपसारखा मजबूत विरोधी पक्ष, फडणवीसांरखा तगडा विरोधी पक्षनेता, केंद्राची ताकद आणि तपास यंत्रणांवर असलेला रिमोट कंट्रोल यांमुळे भाजप हा राज्यात सत्तेत नसला तरी तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार मजबूत पक्ष आहे. यामुळे महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप साम-दाम-दंड-भेद नीती अवलंबण्याची दाट शक्यता आहे, यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.