Pune Water News: पुणेकरांचं टेन्शन वाढलं, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला; किती दिवस पाणी पुरेल?

Pune water supply: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.
Pune Dam Water Level Latest Marathi News
Pune Dam Water Level Latest Marathi NewsSaam TV

Pune water supply Latest News

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये केवळ ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक उरला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे. (Breaking Marathi News)

Pune Dam Water Level Latest Marathi News
Weather Forecast: राज्यात तापमानाचा पारा वाढणार, विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस कोसळणार; वाचा वेदर रिपोर्ट

पुणे शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये केवळ १०.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

गतवर्षीच्या आजच्या तारखेला शहराला पाणीपुरवठा ४ धरणांमध्ये मिळून एकूण १२.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणांमधील एकूण पाणीसाठा हा २.६२ टीएमसीने कमी झाला आहे.

पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, दौंड शहरासाठी आणि शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास, पुणे शहराला जेमतेम ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या मे आणि जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७० टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते.

धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (टक्केवारी)

  • टेमघर - ७.८६ टक्के

  • वरसगाव- ४०.२७ टक्के

  • पानशेत - ३४.५३ टक्के

  • खडकवासला - ५४.९४ टक्के

  • एकूण - ३५.०४ टक्के

टँकरवर अवलंबून असलेली तालुकानिहाय लोकसंख्या

  • पुरंदर --- ९६ हजार ६९९

  • आंबेगाव --- २० हजार ७३९

  • बारामती --- ३१ हजार ६८७

  • भोर --- २ हजार २६१

  • दौंड --- ८ हजार ४४३

  • हवेली --- ४ हजार ६८२

  • इंदापूर --- ७ हजार २५०

  • जुन्नर --- १८ हजार ४२०

  • खेड --- ७ हजार ५३७

  • शिरूर --- २५ हजार २९७

  • एकूण --- २ लाख २३ हजार १५

Pune Dam Water Level Latest Marathi News
Heat Wave: ठाणेकरांसाठी सोमवार ठरला सर्वात उष्ण दिवस; अनेक ठिकाणी पारा चाळीशी पार, रस्त्यांवर शुकशुकाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com