Pune Crime: शिक्षणाच्या माहेरघरात तलवारी कुणी मागवल्या? औरंगाबादेनंतर पुण्यातूनही तलवारी जप्त

Online Swords News: शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातही (Pune) काही अज्ञातांकडून ऑनलाईन तलवारी मागवण्यात येत आहे.
Online sword seized in Pune after aurangabad
Online sword seized in Pune after aurangabadSaam Tv

पुणे: राज्यात सध्या काय चाललंय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. दोन दिवसांपुर्वीच औरंगाबादमध्ये (Aurangabad) ऑनलाईन तलवारी मागवण्यात आल्या होता. या तलवारी (Swords) कुणी आणि कशासाठी मागवल्या याचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र आता शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातही (Pune) काही अज्ञातांकडून ऑनलाईन तलवारी मागवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात काय चाललंय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. (After Aurangabad, Now it's Pune's turn to order swords through courier)

हे देखील पहा -

Online sword seized in Pune after aurangabad
Akola: मजुरीसाठी घेऊन जाणाऱ्या सहा बालकांची सुटका

आजकाल कुरिअर सेवा ही कमी वेळेत वस्तू पोहोचवण्यासाठी महत्वाची सेवा आहे. अनेक लोक ही सेवा वापरतात. काल पुण्यातील कुरिअर कार्यालयात दोन तलवारी सापडल्या. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. पुण्यात कुरिअरद्वारे तलवारी कोणी मागवल्या, याचा तपास स्वारगेट पोलिस करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर म्हणाले, "शुक्रवारी आम्हाला पुण्यातील एका कुरिअर कार्यालयातून एक मोठे, संशयास्पद पार्सल असल्याचा फोन आला. आमच्या कर्मचाऱ्यांनी ते पॅकेज उघडले तेव्हा त्यांना त्यात तलवारी आढळल्या. पॅकेज लुधियानाचे आहे. या तलवारी कोणी मागवल्या याचा तपास करत आहोत." अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान औरंगाबादच्या दंगलीनंतर २०१८ मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. या अगोदर जुलै २०२१ मध्ये ४१ तलवारी, २ गुप्ती आणि ६ कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त करण्यात आला होता. अशा कुरियर कंपनीद्वारे शोभेच्या वस्तू म्हणून तलवारी मागवल्या जातात आणि त्यानंतर त्याला धार लावली जाते, अशी माहिती मिळाली आहे. या तलवारी ज्याच्या नावावर आणि पत्त्यावर मागवण्यात आले, त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ते देखील अर्धवट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामुळे या तलवारी कोणत्या उद्देशासाठी मागवल्या होते हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com