OBC Reservation: मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांडे; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

OBC Political Reservation: आयोगाने दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यात यावा असा युक्तीवाद न्यायालयात झाला होता. त्यानुसार आता उद्या (८ फेब्रुवारीला) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय येण्याची शक्याता निर्माण झाली आहे.
OBC Reservation: Backward Classes Commission Report to CM; Supreme Court hearing tomorrow
OBC Reservation: Backward Classes Commission Report to CM; Supreme Court hearing tomorrowSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Political Reservation) लवकरच महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणसाठी नेमण्याच आलेल्या मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला अहवाल (Report) काल (६ फेब्रुवारी) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) सादर केला होता. याच अहवालाबाबत उद्या (८ फेब्रुवारी) राजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी (Hearing) होणार आहे. त्यामुळे लवकरच ओबीसी आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (OBC Reservation: Backward Classes Commission Report to CM; Supreme Court hearing tomorrow)

हे देखील पहा -

OBC Reservation: Backward Classes Commission Report to CM; Supreme Court hearing tomorrow
ST Strike: एसटी विलीनीकरणाचा अहवाल दोन दिवसांत- अनिल परब

याआधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Political Reservation) स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्या सरकारने ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात लावून धरला होता. सध्याच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर निवडणुकांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाव यासाठी राज्य सरकार आणि विरोधी पक्ष असे सर्वच जण ठाम आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवत आयोगाच्या गोटात चेंडू टाकला होता, आयोगाने दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यात यावा असा युक्तीवाद न्यायालयात झाला होता. त्यानुसार आता उद्या (८ फेब्रुवारीला) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय येण्याची शक्याता निर्माण झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com