Pune Power Cut : उद्या पिंपरीचा वीजपुरवठा राहणार 8 तास बंद; जाणून घ्या कारण

नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
Mahavitran News, Pimpri Chinchwad News
Mahavitran News, Pimpri Chinchwad News saam tv
Published On: 

Pimpri Chinchwad News : तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (शनिवार, ता. 15) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरीगावचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. याबाबतची माहिती महावितरणच्या अधिका-यांनी साम टीव्हीला दिली (Maharashtra News)

Mahavitran News, Pimpri Chinchwad News
Raj Thackeray Kokan Daura News : 'अजित पवार अँड गॅंग बिनखात्याचे मंत्री'; राज ठाकरेंचे मुसळधार पावसात चिपळूणात स्वागत (पाहा व्हिडिओ)

महावितरणने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पिंपरी कॅम्प भागातील पिंपरी कॅम्प (22 KV) उपकेंद्र येथे अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे कामे करायची आहे. त्यामध्ये ब्रेकर पोल बदलणे, ब्रेकर सर्व्हिसिंग करणे, अपघात (accident) प्रवरण ठिकाणचे ( 22 KV) उपरीवाहिनीची दुरुस्ती करणे अशा महत्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

Mahavitran News, Pimpri Chinchwad News
Nitesh Rane News : 'त्या' शब्द प्रयाेगावरुन आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल हाेणार ? पाेलिस, कायदेतज्ञांनी दिली 'ही' माहिती

परिणामी उद्या (शनिवार, ता. 15 जूलै) सकाळी नऊ पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरीगाव, वाघेरे आळी, माळी आळी, कुदळे कॉलनी, B-ब्लॉक, C-ब्लॉक, पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, भाटनगर, मिलिंदनगर आदी ठिकाणचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी, ग्राहकांनी याबाबतची नाेंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने (mahavitran) केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.