मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या अँटिलिया या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ Scorpio ठेवण्यामागे प्रसिद्धी मिळवणे हाच बडतर्फ पोलिस अधिकारी सचीन वाझेचा Sachin Waze हेतू होता, अशी माहिती एनआयएच्या NIA आरोपपत्रातून समोर आली आहे. वाझे प्रकरणात एनआयएने काल मुंबईच्या न्यायालयात आरोपपत्र Charge sheet दाखल केले आहे. NIA files charge sheet against sacin waze
अँटिलियाबाहेर सापडलेली स्फोटके, ही स्फोटके ठेवण्यासाठी विक्रोळीतून स्काॅर्पिओची चोरी आणि मनुसख हिरेनची हत्या अशा तीन घटनांबाबत हे आरोपपत्र असून वाझेसह प्रदीप शर्मा Pradip Sharmaआणि अन्य दहा जणांची नावं या आरोपपत्रात आहेत. एनआयएने या प्रकरणात २०० जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून कट रचणे, अपहरण करणे, स्फोटकाबाबत निष्काळजी पणे वागणे, स्फोटक विना परवाना बाळगणे अशी विविध कलमे लावण्यात आली आहेत.
या स्काॅर्पिओमध्ये धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते.ही धमकी दहशतवादी संघटनेकडून देण्यात आल्याचे दाखवण्यासाठी जैश ऊल हिंद संघटनेचं नाव वापरण्यात वापरण्यात आलं होतं. स्फोटकानी भरलेली कार ही मनसुखची आहे हे माहित असतानाही आरोपींनी दिशाभूल केली होती.
२५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली एक स्कार्पिओ कार सापडली होती. मनसुख हिरेन यांच्या मालकीची ही स्कार्पिओ कार होती. स्फोटकांनी भरलेली कार रस्त्यावर आढळल्याने या घटनेचा तपास एनआयएने कडे सोपवण्यात आला. ही जिलेटीन स्फोटकांनी कार मनसुख हिरेन यांच्या नावावर असल्याने हिरेन यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तसेच त्यांना चौकशीसाठी अनेकदा बोलवण्यात आले होते. त्यामुळे मनसुख हिरेन पूर्णपणे घाबरून गेले होते. मनसुख कुठल्याही क्षणी तोंड उघडू शकतात. हे लक्षात आल्यानंतर मनसुखचा काटा काढायचा कट रचला व त्याचा खून करण्यात आला होता.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.