Mumbai: मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुण, सुप्रिया सुळे प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या...

Supriya Sule News: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
supriya sule News
supriya sule NewsSaam tv
Published On

Supriya Sule Latest News:

मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमध्येही दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी महिलांच्या डब्यात एक तरुण अंमली पदार्थाचं व्यसन करताना आढळला होता. त्यानंतर असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेवरील सीएसएमटीवरून बदलापूरला जाणाऱ्या ट्रेनमधील महिलांच्या डब्यात एक तरुण चक्क नशा करताना आढळला होता. या नशेबाज तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

supriya sule News
Mahadev Jankar News: महाविकास आघाडीमध्ये रासपची एन्ट्री होणार का? शरद पवारांचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले?

मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुण नशा करताना आढळला आहे. हा नशेबाज तरुण कॅमेरात कैद झाला आहे. या नशेबाज तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नशेबाज तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ' मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. महिलांच्या डब्यात घुसून नशा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे, याबाबत स्पष्ट भाष्य तर करीत आहेच. याशिवाय तरुणांना नशेची ही सामुग्री राजरोसपणे मिळत असल्याचे देखील स्पष्ट करीत आहे.

supriya sule News
PM Narendra Modi: भारतातील तरुणांना परदेशात ४० लाख नोकरीच्या संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजगाराबाबत मोठं वक्तव्य

'रेल्वे सुरक्षा आणि मुंबई पोलीस यांनी समन्वय साधून काम केले, तरच अशा प्रकारांना पायबंद घातला जाणे शक्य आहे. या व्हिडिओची रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी नोंद घेऊन उचित ती कारवाई करणे आवश्यक आहे, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com