वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला? राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर मोठा आरोप

वेदांत फॉक्सकॉननंतर आता आणखी एक प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde News, Devendra Fadnavis Newssaam tv
Published On

मुंबई : वेदांत फॉक्सकॉननंतर आता आणखी एक प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. वेदांतनंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Congress : रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावी; काँग्रेस नेत्याची मागणी

महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावर बसवले, असंही महेश तपासे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याचा हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत, अशी टीका देखील तपासे यांनी केली.

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Andheri Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रद्द होणार? निवडणूक आयोगाने घेतली 'त्या' तक्रारीची दखल

वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे, मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका महेश तपासे यांनी उघडकीस आणली आहे.

दरम्यान युकेच्या पंतप्रधान लीज ट्रूस यांनी जसा राजीनामा दिला तसा महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com