Andheri Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रद्द होणार? निवडणूक आयोगाने घेतली 'त्या' तक्रारीची दखल

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
Andheri By-Election
Andheri By-ElectionSaam TV

Andheri East Bypoll Election : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या  (Shivsena)  शाखांवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाने अंधेरी पोटनिवडणूकीतून जबरदस्तीने माघार घेण्यास भाग पाडले अशी तक्रार अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची आता निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

Andheri By-Election
Shivsena : शिंदे, ठाकरे समर्थकांमध्ये पुन्हा वाद; डोंबिवलीनंतर आणखी एका शाखेवर शिंदे गटाचा ताबा

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात लढत होणार होती. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मोठा गाजावाजा करत उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने निवडणुकीत माघार घेतली.

दरम्यान, आता पुन्हा एकदा ही पोटनिवडणूक चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. या पोटनिवडणुकीसाठी उभा राहिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला होता.

Andheri By-Election
Shivsena : नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असला पाहिजे; ठाकरे गटातील नेत्याची मागणी

इतकंच नाही तर, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मला धमकी दिली आणि जबरदस्तीने निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले, त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

दरम्यान, आता निवडणूक आयोगाने मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता अंधेरी निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com