Shivsena : नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असला पाहिजे; ठाकरे गटातील नेत्याची मागणी

बाळासाहेबांचा फोटो नोटांवर असला पाहिजे असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.
balasaheb thackeray
balasaheb thackeray Saam TV
Published On

मुंबई : नोटांवरील फोटोंवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच, आता शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एक मोठं विधान केलं आहे. बाळासाहेबांचा फोटो नोटांवर असला पाहिजे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सरकारने नोटांवरील फोटोंपेक्षा रुपया घसरतो आहे, यावर लक्ष दिलं पाहिजे असंही अनिल परब म्हणाले.

balasaheb thackeray
भारतीय चलनावर गौतम बुद्धांचा फोटो लावा; RPI ची थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्यानंतर देशभरात नोटांवरील फोटोंबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा (BJP) अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जात असल्याचा आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली नोट ट्विटरवर पोस्ट केली आहे. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत. 

balasaheb thackeray
Deepali Sayed: ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे, दिपाली सय्यद नेमक्या कुणाकडून? रांगोळीतून दिले संकेत

काय म्हणाले अनिल परब?

नोटांवरील फोटोंबाबत प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की शिवसेनेनं कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. या नोटांच्या राजकारणामध्ये, शिवसेना गरीबांचा पक्ष आहे. त्यामुळे या सर्व भानगडीत शिवसेना काही जात नाही. परंतू कुणी मला विचारलं की नोटांवर कुणाचा फोटो असला पाहिजे? तर, मी सांगेल बाळासाहेबांचा असला पाहिजे. याचे कारण असं नोटांवर माझा नेता असायला हवा, असं प्रत्येकाला वाटत असेल, तर मी बाळासाहेबांचं नाव सांगेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com