Kiran Shikhare: अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश, NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा

Kiran Shikhare On Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश झाला असल्याचा दावा एनसीपीएचे विद्यार्थी नेते किरण शिखरे यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा संपूर्ण प्रकार सांगितला.
Kiran Shikhare: अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश, NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा
Kiran Shikhare Saam Tv

'अजित पवार गटाने माझा बळजबरीने पक्ष प्रवेश करून घेतला.', असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी नेते किरण शिखरे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. किरण शिखरे यांनी आज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला हे सांगितले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरण शिखरे यांनी हा दावा केला आहे. याचसोबत, 'मी मरेपर्यंत शरद पवार गट आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिल.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

किरण शिखरे यांनी सांगितले की, 'मी किरण शिखरे. नॅशनल जनरल सेक्रेटरी आणि कोकण विभाग अध्यक्ष ही जबाबदारी मला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून देण्यात आली होती. धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे माझे अतिशय जवळचे सहकारी होते. त्यामुळे मला कुठे तरी वाटत होते की त्यांनी पवारसाहेबांसोबत निष्ठेने राहावे. यासाठी मी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना सांगितले होते की त्यांना थांबवता आले तर थांबवा. ते प्रयत्न करायला मी स्वत: गेलो.'

Kiran Shikhare: अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश, NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा
Mumbai Mega Block News: मेगाब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना फटका; मुंबई-पुणे दरम्यान 29 एक्सप्रेस रद्द, लोकल प्रवाशांचेही हाल होणार

'उलट मी ओबेरॉय हॉटेलवर भेटायला गेल्यावर माझ्यावर दबाव टाकण्यात आला की तुमचे सुनिल तटकरे यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही दोन मिनिटं साहेबांना भेटून घ्या. मी धीरज शर्मांना सांगितले की मला प्रवेश करणं जमणार नाही. माझ्यावर प्रेशर टाकू नका. मी विनंती करतो मी जिथे आहे तिथे निष्ठेने आहे. मी कार्यकर्ता म्हणून राहिल. पण माझ्या गोष्टी ऐकल्या गेल्या नाही. मला पार्टी कार्यालयामध्ये नेऊन तिथे काही ठराविक मंडळी जे तुम्हाला फोटोमध्ये दिसले असतील. त्या सर्वांनी मला पक्षात प्रवेश करायला दबाव टाकला.' असे म्हणत किरण शिखरे यांनी अजित पवार गटामध्ये जबरदस्ती प्रवेश करून घेतला असल्याचे सांगितले.

Kiran Shikhare: अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश, NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा
Jitendra Awhad : माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या - जितेंद्र आव्हाड

किरण शिखरे यांनी पुढे सांगितले की, 'मी कुठेही गेलो नाही. मी २४ तासांच्या आत साहेबांकडे आलो आहे. मला खूप टॉर्चर केले गेले. मी कालपासून माझ्या घरी नाही. मी माझ्या घराबाहेर आहे. माझ्या घरापर्यंत समजूत काढण्यासाठी माणसं पाठवली जात आहे. पण मी कुठल्याही गोष्टीला बळी पडलो नाही. मला काल सांगण्यात आले होते की, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आंदोलनादरम्यान जो प्रकार घडला त्याचा निषेध कर. तू एससीचा कार्यकर्ता आहे. मी कुठल्या जातीचा आहे हे कधीच पक्षाने पाहिले नाही. माझ्यासोबत दुजाभाव केला गेला नाही. मी राजीनामा द्यावा आणि साहेबांचा निषेध करावा. माझं पॉलिटिकल करिअर संपावे. मला विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बनवतो असे सांगितले होते. आज किंवा उद्या लेटर घेऊन जा असे बोलले होते. पण मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही.'

Kiran Shikhare: अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश, NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला गळती; मुख्य मार्गाला किती धोका? CM एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

तसंच, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. मरेपर्यंत मी साहेबांसोबत काम करत राहणार. माझे ट्वीट जबरदस्ती डिटील करायला लावले. सुप्रिया सुळे यांनी माझे ट्वीट रिट्विट केले होते ते डिलीट करायला लावले. माझा डीपीवर फोटो ठेवायाला थांबवले जाते. त्या लोकांसाठी ऐवढं करून ते माझ्यासोबत असे करत आहेत. मी माझ्या घरी जाऊ शकत नाही हे प्रेशर आहे माझ्यावर. मी घरी गेल्यानंतर माझे काय होईल हे माहिती नाही. माझ्यावर कुठले गुन्हे दाखल होतील की मला कुठे लटकवले जाईल हे माहिती नाही. मी ब्लॅक आहे. मला मारून टाकले तरी मी पक्ष सोडणार नाही. जो काही प्रकार घडला तो दबावातून होता. मी काल मुंबईवरून कल्याणला पळून गेलो होतो.आज मी माझ्या सहकाऱ्यांसोबत साहेबांना भेटायला आलो.', असे त्यांनी सांगितले.

Kiran Shikhare: अजित पवार गटात बळजबरीने प्रवेश, NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाडमध्ये २ गुन्हे दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com