INDIA Alliance Meeting: घमंडिया कोणाला बोलतात? मोदी सरकारवर निशाणा साधत शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar News In Marathi: 'सत्ताधाऱ्यांना विरोधक एकत्र आले, ते पटत नाही, त्यांना घमंडिया बोलतात,अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली.
Sharad pawar
Sharad pawar Saam TV
Published On

Sharad Pawar News in Marathi

इंडिया आघाडीची महत्वाची तिसरी बैठक मुंबईत संपन्न झाली. २६ पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत विरोधकांच्या २६ राजकीय पक्षातील विविध नेत्यांनी हजेरी लावली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. 'सत्ताधाऱ्यांना विरोधक एकत्र आले, ते पटत नाही, त्यांना घमंडिया बोलतात,अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, 'इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीच्या व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेसचं अभिनंदन करतो. इंडिया आघाडीचा तिसरा टप्पा आहे. या बैठकीमुळे पुढे जाण्यास मदत झाली. प्रत्येक राज्यात वेगवेगळी समस्या आहे. देशातील शेतकरी, मजूर, नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत'.

Sharad pawar
Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

'देशाच्या समोर गंभीर समस्या आहेत, त्यावर एकत्र येत काम करणं गरजेचं आहे. त्याबाबत दोन दिवस आम्ही चर्चा केली. देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बेरोजगारी, महागाईचे विषय आहेत. भाजपच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी प्रत्येक ठिकाणी दिसत आहे, असे ते म्हणाले.

Sharad pawar
INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या समन्वय समितीची घोषणा; शरद पवार, संजय राऊतांसह १४ नेत्यांवर मोठी जबाबदारी

'आज देशातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. इंडियाच्या बैठकीवर भाजपने टीका केली. आम्ही इथे एकत्र भेटलो, त्यावर टीका करण्यात आली. यावरून दिसून येत आहे की, विरोधक इथल्या लोकांना घमंडिया बोलतात. घमंडिया कोणाला बोलतात? सत्ताधाऱ्यांना एकत्र आले ते पटत नाही, त्यांना घंमडिया बोलतात. अशी टीका शरद पवार यांनी केली.

'आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाहीत, जे गेले त्यांना चांगल्या रस्त्यावर आणण्याचं काम करू, असेही म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com