Pankaja Munde : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? अमोल मिटकरी काय म्हणाले, वाचा...

पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपाला सोडचिठ्ठी देतील एवढं निश्चित असल्याचा दावाही मिटकरी यांनी केला आहे.
Pankaja Munde Latest Marathi News
Pankaja Munde Latest Marathi NewsSaam TV

Pankaja Munde Latest News : मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षश्रेष्ठीवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच 'मी पक्षाशी प्रामाणिक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मला पराभूत करू शकणार नाहीत, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. दरम्यान, 'पंकजा मुंडे यांचं राष्ट्रवादीत स्वागत...' असं म्हणत अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. (Pankaja Munde News Today)

Pankaja Munde Latest Marathi News
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारचा मोठा दिलासा; ७५५ कोटींची मदत

पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपाला सोडचिठ्ठी देतील एवढं निश्चित असल्याचा दावाही मिटकरी यांनी केला आहे. 'पंकजा ताईंचे राष्ट्रवादीत स्वागतच आहे असं म्हणत मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं आवाहन देखील केलं आहे. (Latest Marathi News)

'पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी नाही'

'भारतीय जनता पार्टी पंकजाताईंना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करत आहे, आतापर्यंत त्यांना विधान परिषदेवर संधी दिलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याच्या कन्या असूनही आतापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही', असंही मिटकरी म्हणाले. (Maharashtra News)

Pankaja Munde Latest Marathi News
अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात....; जयंत पाटील स्पष्टच बोलले

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचे समर्थन

अमोल मिटकरी यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचं समर्थन देखील केलं. 'खासदार सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केलं तर खरंच आहे. शरद पवार ज्या ज्या वेळी महाराष्ट्राचा दौरा करतात त्यावेळी राज्यात सत्तांतर होते साताऱ्यातील सभा त्याचं उदाहरण आहे', असंही मिटकरी म्हणालेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com