अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात....; जयंत पाटील स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
jayant patil
jayant patil saam tv
Published On

रश्मी पुराणीक

मुंबई : २०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना-कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली, असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी जी युती केली आहे, ती कशासाठी केली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. (NCP leader jayant Patil on congress leader ashok chavan statement)

jayant patil
Dussehra Melava 2022: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी खास एक लाख झेंडे; कसे असणार झेंडे?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले,पंकजा मुंडे यांना भाजप म्हणावे तितके महत्त्व देत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.पंकजा मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो.त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे म्हणून त्यांनी आपले मत खंत म्हणून व्यक्त केले आहे,असेही जयंत पाटील म्हणाले.

jayant patil
Beed News: आरोपीच्या सुटकेसाठी महिलांनी कोर्ट परिसरात अंगावरचे कपडे काढले

मराठा तरुणांबद्दल आणि समाजाबद्दल मंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केले ते अत्यंत धक्कादायक आहे.तीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे, फक्त ते मांडत नाहीत तानाजी सावंत ते मांडत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना कमी बोलण्यास सांगितले असले, तरी माणसाचा स्वभाव जात नाही इथे तर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र झाले आहेत.

आता एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरी माईक समोर आल्यावर मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्याची प्रथा आणि इच्छा बर्‍याच जणांची जागृत होताना दिसते, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला. सुरुवातीला मोदीसरकारकडून सर्वांना गॅस सिलेंडर वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.त्यानंतर सर्वांनी सिलेंडर घेतल्यावर सबसिडी कमी करण्यात आली. म्हणजे गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय,असं वाटायला लागले आहे,असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

jayant patil
T20 World Cup : जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजांना मिळू शकते संधी

आता सिलेंडर वापरावर बंधन आणणे म्हणजे खुल्या बाजारात जो दर असेल (उदाहरणार्थ दोन - अडीच हजार रुपये )त्याच दरात जनतेने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे.असा त्याचा अर्थ आहे.मात्र,या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला व मध्यमवर्गीय नागरिकांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे,असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केलं

नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केले आहे.देशात ज्याच्याकडे भांडवल जास्त आहे त्याला महत्व प्राप्त झाले आहे.श्रीमंत लोकांची संख्या मूठभर आहे आणि गरीब लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे.आपल्या देशाची संपत्ती ठराविक लोकांच्यामध्ये वाटली गेली आहे.देशातील फार मोठा वर्ग हा संपत्तीपासून लांब राहिला आहे.त्यामुळे श्रीमंत आणि गरीब याच्यातील दरी ही मागच्या काळात जेवढी होती ती मागील सात -आठ वर्षांत वाढलेली दिसत आहे.असा निष्कर्ष अनेक अर्थतज्ज्ञांनी काढला आहे,तेच पुन्हा नितीन गडकरी आपल्या भाषणात आणि वक्तव्यातून बोलत आहेत,असंही पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com