T20 World Cup : जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजांना मिळू शकते संधी

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे, पण...
Jasprit bumrah
Jasprit bumrahsaam tv
Published On

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषक खेळणार नसल्याने टीम इंडियाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. बुमराहला दुखापत झाल्याने दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात तो खेळू शकला नाही. आता बुमराहच्या जागेवर कोणत्या गोलंदाजाला स्क्वॉडमध्ये संधी मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Indian cricket team latest news update)

Jasprit bumrah
T20 World Cup Squad Change : टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच बदलणार? काय असू शकतं कारण?

टी-२० विश्वचषक २०२२ चे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात केलं आहे. ही मेगा टुर्नामेंट सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतग्रस्त झाल्याने टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता कोणत्या वेगवान गोलंदाजाला बुमराहच्या जागेवर घेतलं जाईल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१) मोहम्मद शामी : वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची विश्वचषकासाठी स्टॅंडबाय खेळाडूंमध्ये निवड केली होती. शामी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ऑस्ट्रेलियासोबत आफ्रिके विरुद्ध होणाऱ्या मालिकेतही सहभागी होऊ शकला नाही. परंतु, शामी आता कोरोनातून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही एक चांगली बातमी आहे. शामी आता बुमराहच्या जागी खेळण्यासाठी सर्वात मोठा दावेदार आहे. शामीचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर उपयोगी ठरू शकतो. शामीने त्याचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना मागील विश्वचषकात खेळला होता.

Jasprit bumrah
Jasprit Bumrah News : टी-२० वर्ल्डकपआधी भारताला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह स्पर्धेबाहेर

दीपक चहर : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची टी-२० विश्वचषकासाठी स्टॅंडबाय खेळाडू म्हणून निवड केली होती. आशिया कपमध्येही दीपक चहर स्टॅंडबाय खेळाडू होता. परंत,आवेश खानची प्रकृती बिघडल्याने चहरला स्क्वॉडमध्ये सामील करून घेतलं होतं. दक्षिण आफ्रिके विरोधात पहिल्या टी-२० सामन्यात दिपक चहरने चमकदार कामगिरी केली होती. दीपक चहर फलंदाजी करण्यातही माहीर आहे. त्यामुळे बुमराहच्या जागेवर चहर एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

भारताचा गोलंदाज शार्दुल ठाकूरने भारत-ए संघातून न्यूझीलंड-ए विरोधात दमदार कामगिरी केलीय. शार्दुलने तीन सामन्यात 24.50 च्या सरासरीनं चार विकेट्स घेतल्या होत्या. एव्हढच नाही तर त्याने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली. याशिवाय मोहम्मद सिराजही एक जबरदस्त विकल्प ठरू शकतो. सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गाबा टेस्टमध्ये अप्रतिम कामगिरी करत भारताला विजय संपादन करून दिलं होतं.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा,ऋषभ पंत (विकेटकीपर),दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या, आर. आश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्षदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com