जालना : दसरा मेळावा (Dasara Melava) यशस्वी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट अहोरात्र मेहनत करत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. शिंदे गटाचा वेगळा झेंडा दसरा मेळाव्यात पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाने जवळपास एक लाख झेंडे तयार केले आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचे फोटो असलेले खास झेंडे बनवण्यात आले आहे. (Political News)
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नव्या झेंड्याबाबत माहिती देताना म्हटलं की, दोन्ही दसरा मेळावे जवळपास असल्याने आपले कोण आणि परके कोण हे ओळखण्यासाठी शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो असलेले एक लाख झेंडे बनवण्यात आले आहे.
भगव्या रंगाच्या झेंड्यात एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोट असणार आहेत. हे झेंडे दसरा मेळाव्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटण्यात येणार असल्याची माहितीही अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. (Latest News)
जालन्यातील परतूर येथे हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त संवाद साधत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत गद्दारांना धडा शिकवा असे आदेश शिवसैनिकांना दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता किती लोक राहिलेत सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत लाखो लोक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत असलेले हजारो लोक लाखो लोकांना धडा शिकवू शकत नाही, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यापार्श्वभूमीवर हे पोस्टर्स रिलीज करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यासाठी 20 हजार रुपये शुल्क आणि काही डिपॉझिट भरण्यात सांगितले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.