School without bags : पालक-विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होणार?

School education without bags : सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा काहीसा ताण कमी करण्याची तरतूद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत करण्यात आली आहे. या धोरणानुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा १० दिवस दप्तरविना भरणार आहे.
आता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होणार?
School without bags :Saam tv
Published On

सागर आव्हाड,साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांविषयी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तरविना शिक्षण होणार आहे. या दिवसांत शिक्षकांकडून व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी येणारा अभ्यासाचा काहीसा ताण कमी होणार आहे. आता या धोरणाची अंमलबजावणी केव्हापासून करणार, हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दप्तरविना शाळा भरणार आहे. या दहा दिवसांत शाळांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम यांसारखी व्यावहारिक कौशल्ये, सर्वेक्षण, भेटी, सहली असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होणार?
Pune News: इन्स्टाग्रामवरील बनावट लव्ह स्टोरीने घेतला तरुणीचा जीव; मैत्रिणीच्या रुपातील वैरिणीला अटक

या धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आनंददायी करण्यावर भर असणार आहे. तसेच या दिवसांत त्यांना व्यावहारिक कौशल्ये, हस्तकौशल्ये, अनुभवाधिष्ठित शिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही शिफारस केली होती. त्यानुसार, नियमित अध्यापन- अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे.

भोपाळमधील पीएसएस केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेने काही राज्यांतील शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर व्यावसायिक कौशल्ये शिकण्यात रस असण्यासह दप्तराविना दिवसांचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता.

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी पालकांना पुरेसा अवधी मिळावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करावेत, अशा सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com