विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
Navi Mumbai Corrupted Police Officer : बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच घेताना गत सफ्टेंबर महिन्यात रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याने त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 297 टक्के अधिक संपत्ती संपादित केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधात उलवे पोलीस ठाण्यात अपसंपदा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एनआरआय पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याला गत सफ्टेंबर महिन्यामध्ये महेश कुंभार या बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच स्विकारताना मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उलवे येथून अटक केली होती. त्यावेळी एसीबीच्या पथकाने उलवे येथील त्याच्या फ्लॅट मधून मोठी रक्कम देखील जप्त केली होती. प्राथमिक तपासात सतीश कदम याने गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे आढळून आल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहसंचालकाकडून त्याच्या संपत्तीची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार पोलीस दलात दाखल झाल्यापासून सतीश कदम याने अत्तापर्यंतच्या कालावधीत (1 डिसेंबर 2013 ते 9 ऑक्टोबर 2024) जमवलेल्या संपत्तीची तपासणी एसीबीच्या मुंबई युनिटचे पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले व त्यांच्या पथकाने तपासणी केली. सहा महिने सुरू असलेल्या या तपासणीत सतीश कदम याने त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 3 कोटी 48 लाख 40 हजार इतकी (297 टक्के) अपसंपदा केल्याचे आढळून आले आहे.
यावरुन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याने नोकरीच्या कालावधीत पदाचा, अधिकाराचा गैरवापर करुन स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावावर गैरमार्गाने सदरची संपत्ती कमावल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार एसीबीच्या मुंबई युनिटने सोमवारी उलवे पोलीस ठाण्यात सतीश कदम याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13(1)(ब) सह 13(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.