Navi Mumbai : ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली १६ लाखांची रोकड; नवी मुंबईत मोठी खळबळ

Navi Mumbai Police News : नवी मुंबईतील वाशी परिसरात आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Navi Mumbai : ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली १६ लाखांची रोकड; नवी मुंबईत मोठी खळबळ
Navi Mumbai Police NewsSaam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईतील वाशी परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

  • आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

विकास मिरगणे, नवी मुंबई

राज्यात येत्या १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणूक काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आचारसंहिता लागू करण्यात येते. ही आचारसंहिता निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सुरु असतात. या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येते. दरम्यान नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६ लाख १६ हजार रुपयांची रोख रक्कम एका कार मधून घेऊन जाताना पकडण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडून ९ ठिकाणी एकूण ३ सत्रांत २७ स्थिर संनिरीक्षण पथके (SST) कार्यरत आहेत.

Navi Mumbai : ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली १६ लाखांची रोकड; नवी मुंबईत मोठी खळबळ
Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

संनिरीक्षण पथकाने कारवाईदरम्यान आज दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२.३५ वाजता वाशी येथील अरेंजा कॉर्नर परिसरात वाहन क्रमांक MH 43 BG 0002 (पांढरी मर्सिडीज कार) याची तपासणी केली. या तपासणीत अंदाजे १६ लाख १६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Navi Mumbai : ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली १६ लाखांची रोकड; नवी मुंबईत मोठी खळबळ
Kokan Railway : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या, दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रक मोठा बदल

ही कारवाई सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे, तुषार दौंडकर, अधीक्षक/वसुली अधिकारी संजय गायकवाड, पोलीस नाईक सचिन सूर्यवंशी तसेच SST पथक प्रमुख अजय शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रकरणी आयकर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com